पुणे : कोथरूडमधील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मेधा कुलकर्णी आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींनी एका ऊसाचे गुऱ्हाळ चालवणाऱ्या महिलेला मारहाण केल्याची तक्रार केली गेली आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोथरूडमध्ये रामबाग काॅलनीतील गणेश कुंज सोसायटीच्या जवळ असलेल्या एका ऊसाच्या गुऱ्हाळावरून हा वाद पेटला आहे. काही दिवसांपुर्वी या सोसायटीतील नागरिकांनी या गुऱ्हाळामुळे त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. तर हे गुऱ्हाळ अनिधिकृत असल्याचं देखील या नागरिकांचं म्हणणं आहेे. दिपाली चव्हाण या तक्रारदार महिलेने आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
मेधा कुलकर्णी यांनी सोसायटीमधील राहणाऱ्या नागरिकांसोबत हे गुऱ्हाळ हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुऱ्हाळ चालवणाऱ्या दिपाली चव्हाण या महिलेशी आणि त्याच्या पतीशी त्यांची बाचाबाची झाली. यावेळी मेधा कुलकर्णी आणि त्याच्यासोबतच्या लोकांनी त्या महिलेला मारहाण केल्याचा आरोप दिपाली चव्हाण या महिलेने केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील”
व्यवहार माझे, जबाबदार वाझे; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला
“तू खरंच मूर्ख आहेस…”; सुर्यकुमारची पत्नीने उडवली खिल्ली, व्हिडीओ होतोय व्हायरल
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?; मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…