Home महाराष्ट्र “सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील”

“सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील”

मुंबई : सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील! असा इशारा शिवसेनेनं भाजपला दिला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधलाय.

सांगलीत, जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. जळगावात भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे खडसे यांनी आता सांगितले. मग आता जे सत्तांतर घडवून आणले त्यानुसार ही सर्व आश्वासने पूर्ण करा. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला. तेथील पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीचा महापौर केला. हा कार्यक्रम करेक्ट व्हावा यासाठी भाजपाच्या 17 नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा पाहून मतदान केले. आता त्यापेक्षा करेक्ट कार्यक्रम जळगाव महानगरपालिकेतही झाला असून भाजपच्या 27 नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा ओळखून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मतदान केले. अशातऱ्हेने सांगलीपाठोपाठ जळगावात भाजपचा गड पडला आहे. जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

व्यवहार माझे, जबाबदार वाझे; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला

“तू खरंच मूर्ख आहेस…”; सुर्यकुमारची पत्नीने उडवली खिल्ली, व्हिडीओ होतोय व्हायरल

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?; मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची मागणी