मुंबई : सचिन वाझे प्रकरणात अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. परमवीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. या निर्णयावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
कशाचाच कोणाला पत्ता नाही, कोणाचा कोणावर अंकुश नाही असं हे भिकार ठाकरे सरकार. मुख्यमंत्र्याना मेसेज टाकून अधिकारी सुट्टीवर जायला लागले म्हणजे मुख्यमंत्र्याची काय किंमत आहे हे यावरून दिसते, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
कशाचाच कोणाला पत्ता नाही, कोणाचा कोणावर अंकुश नाही असं हे भिकार ठाकरे सरकार. मुख्यमंत्र्याना मेसेज टाकून अधिकारी सुट्टीवर जायला लागले म्हणजे मुख्यमंत्र्याची काय किंमत आहे हे यावरून दिसते. मंत्रालय ची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कस ची पाटी लावा. https://t.co/jpjevDjVdd
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
अभिनेते सतिश काैशिक कोरोना पाॅझिटिव्ह; स्वत: ट्विट करत दिली माहिती
“न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले BOLD फोटोज”
“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”
जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; भाजपला धक्का देत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा