मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत असलेल्या करूणा शर्मा आता राजकीय मैदानात उतरणार आहेत. करूणा शर्मा यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.
मी समाजसेविका असून राजकारणातही येईल. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, असं करूणा शर्मा म्हणाल्या. स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन त्या महापालिकेत आल्या होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंमधील असलेल्या नात्यावर जाहीरपणे बोलण्यास नकार दिला. तसेच गेली 25 वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या 2 महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे., असं करूणा शर्मा म्हणाल्या.
दरम्यान, माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेल, असंही करूणा शर्मा यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“हे ठाकरे सरकारचे पाप; मुंबई पोलीसांची इतकी बदनामी कधीच झाली नव्हती”
“हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त”
आशिष शेलारांचे आरोप बालिशपणाचे, त्यांची कीव येते- नाना पटोले