Home महाराष्ट्र सचिन वाझे प्रकरणी ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार – अजित पवार

सचिन वाझे प्रकरणी ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार – अजित पवार

मुंबई : सध्या राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सुरुवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की कोणत्याही गोष्टींमध्ये चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे महाविकासआघाडी सरकारचे काहीही कारण नाही, असं अजित पवार म्हणाले.

सरकार तसं अजिबात होऊ करणार नाही. NIA आणि ATS  अशा दोन यंत्रणा याप्रकरणी चौकशी करत आहेत. ज्या घटना पुढे येतात, त्यानुसार कारवाई करण्यात येईल,” असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

…म्हणून ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असतात; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

बेळगावातील मराठी माणसांवरील अत्याचार थांबत नसतील तर…; शिवसेनेचा इशारा

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

“अहमदनगरमध्ये भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”