“भाजपचा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही”

0
152

मुंबई : मुंबईकरांच्या भल्यासाठी महापालिकेत सत्तांतर आवश्यक असून आगामी काळात मुंबई पालिकेवर भगवाच, मात्र तो भाजपचा असेल., असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीस यांच्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही., असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईवर जेंव्हा जेंव्हा संकट आले तेंव्हा मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. त्यामध्ये शिवसैनिकांचं योगदान राहिलं आहे. शिवरायांचा भगवा मुंबईवर 50 वर्षांपासून फडकत आहे., असं राऊत म्हणाले.

दरम्यान, मुंबईला वेगळं करण्याचा डाव सुरू आहे. तसेच शुद्ध भगवा कुणाचा हे जनता ठरवेल, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“बाॅलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरी कोरोनाची एन्ट्री”

शिवसेनेनं गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय- प्रवीण दरेकर

“लोकांना कर्मयोग आवडतो बोलघेवडेपणा नाही”

“मुख्यमंत्री कोणत्याच परीक्षेला बसले नाहीत, मग सर्टिफिकेट कसं देणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here