पुणे : मी राज्याचा मुख्यमंत्री असताना सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निलंबित असतानाही त्यांना सेवेत घेण्यासाठी शिवसेनेच्या काही नेत्यांनी मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आग्रह धरला होता. त्यावेळी मी वाझेंची फाईल अॅडव्होकेट जनरलना दाखवली होती. त्यावेळी त्यांनी मला वाझेंना सेवेत न घेण्याचा तोंडी सल्ला दिला होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान, वाझे यांना उच्च न्यायालयाने निलंबित केलं आहे. त्यामुळे त्यांना सेवेत घेता येणार नाही. तो कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल, असं मला अॅव्होकेट जनरलनी सांगितलं होतं. त्यामुळे मी वाझेंना सेवेत घेतलं नव्हतं, असंही फडणवीस म्हणले.
महत्वाच्या घडामोडी –
टाॅस जिंकून भारताचा बाॅलिंगचा निर्णय; भारतीय संघात ‘या’ दोन खेळाडूंच पदार्पण
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचं अमित शहांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवली- चंद्रकांत पाटील
मोठी बातमी! सचिन वाझेंना 10 दिवसांची पोलीस कोठडी