Home पुणे “शरद पवार हे आमचं दैवत; संरक्षण काढून घेणं म्हणजे त्यांचा अपमान”

“शरद पवार हे आमचं दैवत; संरक्षण काढून घेणं म्हणजे त्यांचा अपमान”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यातच आता महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आमचे आधारस्तंभ आहेत. केंद्र सरकाराने त्यांची सुरक्षा काढून घेतली तर आम्ही दिल्लीत जाऊन त्याच्या बंगल्याबाहेर थांबू आणी त्यांचं संरक्षण करु, असं आप्पासाहेब कदम यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांना आम्ही बजरंग बली हनुमानाच्या ठिकाणी मानतो. ते आमचे दैवत आहेत. त्यांचं संरक्षण काढून त्यांचा अपमान केलाय. त्याचं उत्तर देण्यासाठी तमाम मल्ल सरसावले आहेत, असंही आप्पासाहेब म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय निंदनीय आहे. त्यांना सरकारी संरक्षणाची गरज नाही. पैलवानाच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या पवारसाहेबांची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो मल्ल घेतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…म्हणून भाजपने हा तपास एनआयए कडे सोपवला- सचिन सावंत

“दोन झेंड्यांची योजना करणं घसरलेल्या गाडीचे लक्षण”

…तर ती चुकीची गोष्ट आहे; रोहित पवारांचा भाजपला इशारा

भीमा कोरेगाव दंगलीमागे देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र- शरद पवार