मुंबई : मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला !
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 13, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मराठी भाषेत स्टेट्स ठेवलं म्हणून तिघांना कर्नाटक पोलिसांनी केली अटक”
बाॅलिवूडकरांवर कोरोनाचं सावट! बॉलिवूडचे आणखी 2 मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!
“राष्ट्रवादी-काँग्रेसने मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही अशीच खबरदारी घेतली”
“…दुभत्या म्हशी च्या लाथा गोड”; अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला