संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा- नितेश राणे

0
208

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी नुकतीच ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू आहेच. मात्र माझ्या माहितीप्रमाणे हे सुरु असतानाच याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत., असं नितेश राणे म्हणाले. तसेच संजय राऊतांच्या नातेवाईकांना नोटीस मिळाल्यामुळेच ते जास्त फडफड करत आहेत, असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, ईडीच्या कारवाईमुळेच संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना?, अशीही मला शंका आहे., असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांनी सोडलं माैन; म्हणाले…

“शरद पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, आता शिवसेनेलाही नोटीस आलीय, ईडीचा पायगुण चांगला, येऊ द्या नोटीसा”

“कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी बारा वर्ष पाट्या टाकल्या”

“वर्षभरातील सरकारची कामगिरी शोभणारी नाही, जनता ठाकरे सरकारला नापास ठरवेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here