Home महाराष्ट्र “औरंगाबादमध्ये कडकडीत लाॅकडाऊन; पहा काय सुरू, काय बंद”

“औरंगाबादमध्ये कडकडीत लाॅकडाऊन; पहा काय सुरू, काय बंद”

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये आजपासून 2 दिवस कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार औरंगाबादमध्ये आज आणि उद्या 2 दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळं औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे 2 दिवस लॉकडाऊन असणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि एमआयडीसी वगळता सर्व बंद राहणार आहे.

दरम्यान, या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरात शेकडो पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

औरंगाबादमध्ये हे बंद राहणार?

* औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था व इतर तत्सम संस्था बंद राहतील.
* सर्व प्रकारच्या धार्मिक सभा, राजकीय सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, आंदोलने, मोर्चे, धरणे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध
* आठवडी बाजार, जलतरण तलाव (Swimming Pool), क्रीडा स्पर्धा बंद राहतील.
* सर्व प्रकारची सभागृहे, मंगल कार्यालये, लॉन्स पूर्णपणे बंद राहतील.
* कोणत्याही सार्वजनिक विवाह समारंभास परवानगी असणार नाही.
* औरंगाबाद शहरातील जाधवमंडी 11 मार्च ते 17 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहील.

औरंगाबादमध्ये हे सुरु राहणार?

1) वैद्यकीय सेवा दुकाने व बाजारपेठा, D-Mart/ Reliance/Big Bazar/More इ.
2) वृत्तपत्र, मिडीया संदर्भातील सेवा मॉल्स, चित्रपटगृहे / नाट्यगृहे
3) दूध व्रिक्री व पुरवठा इ. हॉटेल, रेस्टॉरंट (प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलिव्ही व त्यासाठी स्वयंपाकगृहे/ किचन रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा राहील.)
4) भाजीपाला विक्री व पुरवठा सर्व खाजगी कार्यालये/ आस्थापना
5) फळे विक्री व पुरवठा
6) जीवनावश्यक वस्तुंची दुकाने
7) पेट्रोल पंप, गॅस एजन्सी
8) सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (खाजगी व शासकीय), रिक्षासह इ.
9) बांधकामे
10) उद्योग व कारखाने
11) किराणा दुकाने (फक्त Stand Alone स्वरुपातील)
12) चिकन, मटन, अंडी व मांस व मच्छी दुकाने
13) वाहन दुरुस्ती दुकाने / वर्कशॉप
14) पशुखाद्य दुकाने
15) बँक व पोस्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानुसार सेवा सुरू ठेवण्यास मुभा राहिल.
16) नोंदणीकृत पद्धतीने विवाहास परवानगी असेल.

महत्वाच्या घडामोडी –

“विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?”

मी तर म्हणतो की हे सरकार एकही दिवस राहू नये- नारायण राणे

“भारत विरूद्ध इंग्लंड टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय”

‘वाजले की बारा’ व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळे यांना थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर