नवी दिल्ली : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लस घेताना अनेकांनी फोटो, व्हिडीओ काढले आणि सोशल मीडियावर अपलोडही केलं तर काहींनी लस घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. अशातच सोशल मीडियावर लसीकरण केंद्रातील एक गमतीदार व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी लस घेताना खदखदून हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोव्हिड लस घेण्यासाठी पोलीस कर्मचारी लसीकरण केंद्रावर पोहोचले मात्र नर्सने त्यांना स्पर्श करताच ते जोरजोरात हसायला लागले. लस टोचण्याच्या आधीच त्यांना हसायला येत होतं. ते पाहून बाकी लोकही हसायला लागले.
आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ नागालँडच्या कोरोना लसीकरण केंद्रातला आहे असं सांगितलं आहे.
दरम्यान, त्या पोलीस कर्मचाऱ्याने लस घेतली की नाही, माहित नाही पण त्यांना सुईपेक्षा नर्सच्या स्पर्शाने जास्त गुदगुल्या होत होत्या असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर फार कमी वेळात हा व्हिडीओ सुपरहिट झाला असून तुफान व्हायरल होत आहे.
#Covid19 #Vaccination gem apparently from #Nagaland.
Not sure whether he had it finally but
Looks like he was more anxious about the ‘tickling’
शायद सुई से नहीं , #स्पर्श की #गुदगुदी से हंगामा हो रहा था । pic.twitter.com/9ZTmX3URnc
— Rupin Sharma IPS (@rupin1992) March 7, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, हेच समजत नाही”
“मोठी बातमी! जळगावमध्ये 3 दिवसांचा जनता कर्फ्यू”