मुंबई : बंगालच्या निवडणुकीत स्वत: न उतरता ममता बॅनर्जी यांच्या तृणमुलला पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. यावर भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिलाय, असं म्हणत राम कदम यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच बंगालच्या निवडणुकीत शिवसेना का उतरत नाही?, असा प्रश्न करत शिवसेनेनं बंगालच्या निवडणुकीत उतरावं त्यांना त्यांची औकात कळेल, असा हल्लाबोलही राम कदम यांनी यावेळी केला.
दरम्यान, शिवसेनेला बिहार मध्ये एकाही जागेवर डिपॉझिट वाचवता आलेलं नाही. त्यातून धडा घेत त्यांनी बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय घेतल्याचा टोला राम कदम यांनी लगावला. तसंच जरी शिवसेना बंगालमध्ये लढली तरी देखील एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचवू शकणार नाही, असंही राम कदम म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”
“वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला, तुम्हाला उत्तर देणार नाही”
“पूजा चव्हाणचा लॅपटाॅप चोरल्याचा आरोप; भाजपचा ‘तो’ नगरसेवक गायब”