नागपूर : जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणावर संताप व्यक्त करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
बीड जिल्हा सहकारी बँक, महिलांवरील अत्याचार आणि जळगावमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिलांवरील अत्याचार वाढत असून त्यावर सरकारकडून काहीही कारवाई होत नसल्याची तक्रार राज्यापालांकडे केली.
जळगावातील घटनेने महिलांवरील अत्याचाराचं प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. राज्यात अरेरावी सुरू आहे. जळगावातील घटनेत पोलीस अधिकारीच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यात चाललंय तरी काय? ज्या राज्यातील सत्तेतील लोकच आपल्या प्रतिमेचं पोषण करू शकत नाही. तेच जर अन्याय करणारे असतील तर दुसऱ्यांना काय शिस्त लागणार आहे?, असा सवाल पंकजा यांनी यावेळी केला.
दरम्यान, मी विधानसभेत नाही. पण सभागृहाबाहेर महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवणार आहे. जळगाव घटनेतील संबंधितांना आधी निलंबित करा आणि मगच चौकशी करा, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री; ‘नटसम्राट’वरुन नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
“RCB साठी खुशखबर! 14.25 करोडला खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूने ठोकल्या एका षटकात ‘तब्बल’ इतक्या रन्स”
कोरोना म्हणतोय मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
…तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग- सुधीर मुनगंटीवार