मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
या अधिवेशनामध्ये मनसेनं आपला नवा झेंड्याचं अनावरण केलं आहे. मनसेच्या झेंड्याचे स्वरुप स्पष्ट झालं आहे. मनसेचा हा झेंडा भगव्या रंगाचा आहे आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ असं याचं स्वरूप आहे. गोरेगावमध्ये मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे यांचं आज गोरेगावातल्या मनसेच्या अधिवेशनात अधिकृतपणे लॉन्चिंग झालं आहे. त्यांची आज मनसेच्या नेतेपदी निवड झाली आहे
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी ज्यांनी हात वर उचलले होते त्यांचे खांदे निखळले- उद्धव ठाकरे
सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाहीत- पंकजा मुंडे
‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठ निर्णय
शिवथाळी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डाची सक्ती