इंदापूर : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे, असं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. ते इंदापुरमध्ये बोलत होते.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये तातडीने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भातल्या उपाय योजना आणि सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, इंदापूर तालुक्यात सध्या 108 जण कोरोना पॉझिटिव रुग्ण आहेत. यामध्ये इंदापूर ग्रामीण मधील 76, तर इंदापूर शहरात सध्या 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, की या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही”
टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूची चाैथ्या कसोटीतून माघार; BCCI ने दिली माहिती
“ही चित्रा वाघच तुम्हांला पुरुन उरेन”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, पूजा चव्हाण प्रकरणात योग्य निर्णय घेतील”