Home क्रीडा टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूची चाैथ्या कसोटीतून माघार; BCCI ने दिली माहिती

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूची चाैथ्या कसोटीतून माघार; BCCI ने दिली माहिती

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारताने 10 विकेट्सने जिंकत 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1अशी आघाडी घेतली आहे.

मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडला विजय मिळवणं अनिवार्य आहे. तर विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे किंवा अनिर्णित राखणे महत्त्वाचे आहे. अशातच भारताच्या वेगवान गोलंदाजाने चौथ्या कसोटीतून माघार घेतली असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने चौथ्या आणि शेवटच्या कसोटीतून माघार घेतली आहे. काही वैयक्तिक कारणांसाठी चमूतून आणि बायो-बबलमधून बाहेर जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती बुमराहने बीसीसीआय व्यवस्थापनाला केली होती. त्यानुसार त्याला संघातून रिलीज करण्यात आलं आहे, अशी माहिती बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान, त्यामुळे शेवटच्या सामन्यासाठी इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्यापैकी दोघांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ही चित्रा वाघच तुम्हांला पुरुन उरेन”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, पूजा चव्हाण प्रकरणात योग्य निर्णय घेतील”

“राज ठाकरेंनी मास्क नाही घातला आणि कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार नाही”

“पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला”