आमदारांच्या हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का-सुमीत राघवन

0
169

मुंबई. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजपा विरूद्ध शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र आले. या सत्ता संघर्षात फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून तिन्ही पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. यावर अभिनेता सुमीत राघवनने ट्वीट केलं आहे.

या पंचतारांकित हॉटेल्स बिल कोण भरेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सत्ता स्थापनेनंतर आमदारांच्या हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का, असा उपरोधिक टोला अभिनेता सुमीत राघवनने लगावला आहे.

‘ट्रायडंट, रेनेसन्स, ललित, हयात, मॅरिएट या हॉटेल्सनी त्यांच्या मेनूकार्डमधून ‘खिचडी’ हा पदार्थ वगळावा. पण आता या हॉटेल्सची बिलं कोण भरणार?? शेतकरी, कदाचित .., असं ट्वीट सुमित राघवनने केलं आहे.

दरम्यान, मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here