बीड : काही लोकांना सत्तेचा उन्माद आला आहे, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्याय विकास मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
बीड जिल्ह्यातील शांतता आणि सुख कायम राहावं असं पालकत्व कोणाचं ही मिळावं मग ते कोणीही असो अशी भावना होती पण सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाहीत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील शांतता आणि सुख कायम राहावं असं पालकत्व कोणाचं ही मिळावं मग ते कोणीही असो अशी भावना होती पण सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाही माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, दबाव, दहशत हेच ध्येय दिसतंय पालकांचं …हे खपवून घेतलं जाणार नाही ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 22, 2020
माझ्या कार्यकर्त्याला मारहाण, दबाव, दहशत हेच ध्येय दिसतंय पालकांचं. हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टिकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठ निर्णय
शिवथाळी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डाची सक्ती
त्या व्हिडीओशी भाजपचा काहीही संबंध नाहीये- चंद्रकांत पाटील
पुस्तक झालं आता व्हिडीओ हे अशोभनीय; संभाजीराजे भडकले