सांगली : राज्यात पुन्हा एकदा करोना संकट वाढू लागल्याने सरकार आणि आरोग्य विभाग वारंवार नियमांचं पालन करण्याची विनंती करत आहे. मात्र सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी चक्क आमदारालाच मास्क काढायला सांगितल्याची एक घटना समोर आली आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना उद्धाटनाआधी तोंडावरील मास्क काढायला लावला.
करोना होत नाही मास्क काढा असं सांगितल्यावर बाबर यांनीदेखील मास्क काढून टाकला. संभाजी भिडे यांनी फक्त आमदारच नाही तर तिथे उपस्थित आणखी एका व्यक्तीलाही मास्क काढायला सांगितला. त्यानंतरच अनिल बाबर यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आलं.
महत्वाच्या घडामोडी –
कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे- देवेंद्र फडणवीस
तृप्ती देसाईंच संजय राठोड यांना खुलं पत्र; म्हणाल्या…
धनंजय मुंडेंनी बलात्कार आरोपाचं प्रकरण काय देऊन सेटल केलं, हे त्यांनाच ठाऊक- निलेश राणे
“मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत”