रत्नागिरी : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन केलं. यावर बोलताना संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन अयोग्य होते. याप्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर नक्की कारवाई होईल, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. ते गुरुवारी रत्नागिरीत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही, असम विनायक राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करणे योग्य ठरणार नाही. पोहारादेवीतील गर्दीमुळे मुख्यमंत्री संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत का, हे मला माहिती नाही. या प्रकरणावरुन महाविकासआघाडीत कोणतीही खदखद नाही. परंतु, जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत, असंही विनायक राऊत यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
संजय राठोड यांची अडचण वाढण्याची शक्यता; पूजाला दिलेल्या गिफ्टबॉक्सचे ‘हे’ धक्कादायक फोटो व्हायरल
ठाकरे सरकारकडून बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरु- नारायण राणे
पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं राज्य सरकार विचारले ‘हे’ 14 प्रश्न