दुबई : आयपीएलच्या आजच्या सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान राॅयल्सचा विकेट्सनी पराभव केला.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान राॅयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 154 धावा केल्या. राजस्थालकडून संजू सॅमसनने 26 चेंडूत 36 धावा, बेन स्टोक्सने 32 चेंडूत 30 धावा, रियान परागने 12 चेंडूत 20 धावा, तर जोफ्रा आर्चरने 7 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. तर हैदराबादकडून जेसन होल्डरने 3, तर विजय शंकर व राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने हे लक्ष्य 18.1 षटकात पूर्ण केले. सनरायझर्स हैदराबादकडून मनिष पांडेने नाबाद सर्वाधिक 47 चेंडूत 83 धावा केल्या. तर विजय शंकरने नाबाद 51 चेंडूत 52 धावांचे याेगदान दिले. मनिष पांडे व विजय शंकरने नाबाद 140 धावांची भागीदारी करत हैदराबादला विजय मिळवून दिला. तर राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 2 विकेट घेतल्या.
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्र राज्य बंगालच्या दिशेने वाटचाल करीत आहे; निलेश राणेंची राज्य सरकारवर टीका
जेसन होल्डरची शानदार गोलंदाजी; राजस्थानचे हैदराबादसमोर 155 धावांचे लक्ष्य
सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी- पार्थ पवार