मुंबई : ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ ह्या चित्रपटाबाबत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तेरा दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्यानं चित्रपट करमुक्त करण्याअगोदर उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता.
चित्रपटामध्ये सुभेदार तान्हाजी मालुसरेंची प्रमुख भूमिका अभिनेता अजय देवगननं साकारली आहे. मंगळवारी प्लाझा चित्रपटगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजय देवगनसोबत चित्रपट पाहणार होते. त्यासाठी प्लाझा चित्रपटगृहात खास शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी अजय देवगन सोबत नाही तर आपण मंत्रिमंडळासोबत चित्रपट पाहणार असल्याचं सागितलं.
महत्वाच्या घडामोडी-
शिवथाळी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डाची सक्ती
त्या व्हिडीओशी भाजपचा काहीही संबंध नाहीये- चंद्रकांत पाटील
पुस्तक झालं आता व्हिडीओ हे अशोभनीय; संभाजीराजे भडकले
हा तानाजी मालुसरेंचाअपमान शिवरायांवर प्रेम करणारी जनता खपवून घेणार नाही- सुप्रिया सुळे