Home महाराष्ट्र सांगली महापौर निवडणूक! पराभव भाजपच्या जिव्हारी, ‘त्या’ फुटलेल्या नगरसेवकांवर करणार कारवाई

सांगली महापौर निवडणूक! पराभव भाजपच्या जिव्हारी, ‘त्या’ फुटलेल्या नगरसेवकांवर करणार कारवाई

सांगली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. भाजपची 6 मतं फोडून ती आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी वळवण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकीय धुरिणांना यश आलं आहे. राष्ट्रवादीला सहकार्य करणाऱ्या सहा नगरसेवकांवर भाजपकडून कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

सांगलीचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे आणि महापालिका गटनेते सुधीर सिंहासने यांच्याकडून सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, काल झालेल्या सांगली महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या पाच नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं होतं, तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय सुकर झाला.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोना डोकं वर काढतोय! जालना जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद

कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की- संजय राऊत

“चित्राताई ठेचतील या भितीनं नागोबा बाहेर आला”

“जगप्रसिद्ध गोल्फर टायगर वूड्सचा भीषण अपघात”