Home महाराष्ट्र कोरोना डोकं वर काढतोय! जालना जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद

कोरोना डोकं वर काढतोय! जालना जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद

जालना : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातही शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांसह बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.

कोरोनामुळे वाढत्या प्रादुर्भावामुळं जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. तसेच फळे व भाजीपाला विक्रेते, न्यूजपेपर वेंडर्स यांच्या वेगाने अॅंटीजेन चाचण्या करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत, असंही देशमुख यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की- संजय राऊत

“चित्राताई ठेचतील या भितीनं नागोबा बाहेर आला”

“जगप्रसिद्ध गोल्फर टायगर वूड्सचा भीषण अपघात”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”