मुंबई : सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून भाजपला डिवचलं.
जयंतरावांच्या अचूक नियोजनाकडे लक्ष वेधत टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, असं म्हणत महेश तपासे यांनी भाजपला टोमणा मारला.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला. काँग्रेसने समर्थन दिलं. काँग्रेसचा उपमहापौर, तर स्थायी समिती अध्यक्ष झाला. महापालिकेत भाजप हद्दपार झाली. जयंत पाटील यांची कामगिरी उल्लेखनीय होती, असं महेश तपासे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ- निलेश राणे
राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहे का?; प्रवीण दरेकरांचा सवाल
“नोकरीच्या देण्याच्या आमिषाने तरूणीला कारमध्ये बसवलं, चालत्या कारमध्ये केला बलात्कार”