अकोला : राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह विदर्भातही रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे.
विदर्भामध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांव येथील संत गजानन महाराज मंदीर पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय मंदीर प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंदीर प्रशासनाने म्हटलं आहे.
दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत मंदीर बंद राहणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय; म्हणाले
“नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 संचारबंदी”
“राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”