Home नाशिक “नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 संचारबंदी”

“नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 संचारबंदी”

नाशिक : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह विदर्भातील शहरांमध्येही रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदीची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

कोरोनाचा धोका वाढतोय त्यामुळं नियमांचं पालन करा, मास्क न वापरल्यास 1 हजार रुपये दंड भरावा लागणार. तसेच 8 दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर आहे त्यापेक्षाही कडक निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही छगन भुजबळ यांनी यावेळी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”

“अकोल्यात 23 फेब्रुवारी पासून 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन”

लॉकडाउन पुन्हा करावा लागेल का?; मुख्यमंत्री उद्धव ठकारे म्हणतात…