मुंबई : 2014 मध्येही शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे.
2014 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे शिवसेनेने त्यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला असेल. मात्र, शिवसेनेने आम्हाला तशी कोणतीही ऑफर दिली नव्हती, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेसोबत आमची कोणतीही चर्चा त्यावेळी झाली नव्हती. त्यांची काँग्रेसशी चर्चा झाली असावी, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपने 2014 साली अल्प मतांवर सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेकडून आघाडीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी प्रस्ताव आला होता. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याशी संपर्क साधला. मात्र, मी तो प्रस्ताव फेटाळून लावला, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…म्हणून झाली उर्वशी रौतेला ट्रोल
गेली सात वर्षे मी सर्व सहन केलं; धनंजय मुंडे झाले भावूक
“नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना”
‘तान्हाजी द अनसंय वॉरियर’ चित्रपटात दाखवलेला इतिहास चुकीचा- सैफ अली खान