नागपूर : शिवसेना हिंदुत्वापासून दूरावली आहे आणि शिवजयंतीला परवानगी नाकारून त्यांनी हे सिद्ध केलं, असं म्हणत मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच या सर्व गोष्टींना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचंही अमित ठाकरे म्हणाले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
सर्व महापुरुषांचे जन्म आपण उत्सवाप्रमाने साजरे केले पाहिजे आणि त्यासाठी राज्य सरकारने शिवजयंतीला आणि मिरवणुकीला परवानगी देणं गरजेचं आहे. सर्व जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचं चित्र दिसून येत आहे., असंही अमित ठाकरे ठाकरे यांनी म्हटलं.
दरम्यान, युवा वर्ग, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि इतर वर्ग रस्त्यावर उतरले आहेत, असं मतही अमित ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.
महत्वाच्या घडामोडी
‘ये नैना डरे डरे’! अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज; पहा व्हिडिओ
“जळगाव हादरलं! ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यु”
“आजपासून टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार”
रोहिणीताई, राष्ट्रवादीनं तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू- जयंत पाटील