Home महाराष्ट्र “आजपासून टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार”

“आजपासून टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार”

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) रविवारी रात्री 12 वाजल्यापासून सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTAG मधून टोल भरावा लागणार आहे. तसेच ज्यांच्याकडे FASTAG नसेल त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

एनएचएआयने 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय दिला होता. नंतर तो दीड महिना वाढवण्यात आला. मात्र आता FASTAG च्या अंमलबजावणी मुदतीला पुढे ढकललं जाणार नाही, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल स्पष्ट केलं.

दरम्यान, त्यामुळे काल रात्री 12 वाजलेपासून सर्व टोल प्लाझावरील कॅशलेन बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच कोणताही वाद होऊ नये म्हणून टोल प्लाझावर सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात येणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी 

रोहिणीताई, राष्ट्रवादीनं तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू- जयंत पाटील

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या- चंद्रकांत पाटील

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळ वळण, पूजाच्या वडिलांनी सांगितलं आत्महत्येचे कारण; म्हणाले…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…