नटीला सुरक्षा देणारे, तिच्या स्वागताला गेलेले रामदास आठवले आता कुठे गेले?; संजय राऊतांचा आठवलेंना सवाल

0
212

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांना टोला लगावला आहे.

नटीला सुरक्षा देणारे, तिच्या स्वागताला गेलेले रामदास आठवले आता कुठे गेले?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, तसेच हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळणार का? न्याय मिळण्यासाठी नटीच हवी का?, ती पीडिता कोणालाही आपली वाटत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी रामदास आठवले यांना लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बाबरी पडली नसती तर राम मंदिराचं भूमिपूजन पहायला मिळालं नसतं- संजय राऊत

“दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग चंगला नव्हता”

“भारताने कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवले”

जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते…; निलेश राणेंची शरद पवारांवर बोचरी टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here