मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटमध्ये साधर्म्य असल्याचं सांगत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं सांगितलं होतं. त्यावर भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत देशमुख यांच्यावर करोनावरून टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे
विद्वान व्यक्ती नम्र असते,अन पोकळ व्यक्ती उथळ पाण्यासारखं ‘खळखळ कर’ते! भाजपच्या नेत्यांसह अनेकांना कोरोना झाला, तेंव्हा त्यांना बरं होण्यासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या. भाजपचे उथळ नेते शुभेच्छा देतच नाहीत पण कोरोनामुळं मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत, असं रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, या संदर्भात रोहित पवारांनी ट्विट केलं आहे
विद्वान व्यक्ती नम्र असते,अन पोकळ व्यक्ती उथळ पाण्यासारखं ‘खळखळ कर’ते!
भाजपच्या नेत्यांसह अनेकांना कोरोना झाला, तेंव्हा त्यांना बरं होण्यासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या. भाजपचे उथळ नेते शुभेच्छा देतच नाहीत पण कोरोनामुळं मेंदूवर परिणाम होत असल्याचं बरळत आपले संस्कारच दाखवून देत आहेत.— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 8, 2021
महत्वाच्या घडामोडी
“या’ कारणामुळं अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी”
“राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैव”
हे सरकार बालकांचं हत्यारं आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारं सरकार- चित्रा वाघ