मुंबई : शेतकरी आंदोलनावर मास्टर ब्लास्टर व भारतरत्न सचिन तेंडुलकरने भाष्य केलं होतं. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असं सचिननं म्हटलं होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का ?, असं ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले,
भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का ?@sachin_rt https://t.co/oEh9t4LzXp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 5, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी काही घेणंदेणं नाही”
फासा आम्हीच पलटणार; देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान
जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवलीये- जयंत पाटील
“गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण”