मुंबई : शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलवर मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचं समर्थन करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारबद्दल फडणवीस असं वक्तव्य करत आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे आपल्या देशातील लोकांना माहित आहे. उलट केंद्र सरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल 100 रुपये लिटर झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नये. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी फडणवीसांनी असं वक्तव्य केलं असणार, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?- आशिष शेलार
“शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून दाखवावं, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये”
हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा- उद्धव ठाकरे