“राष्ट्रवादीत इनकमिंगचा धुमधडाका, ‘या’ पक्षातील नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”

0
395

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

कालच महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या उल्हासनगर महापालिकेतील ओमी कलानी गटाच्या तब्बल 22 नगरसेवकांसह 46 जणांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज मुंबईच्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात मालेगाव येथील समाजवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हे ही वाचा : “भाजपमध्ये गळती सुरूच; बुलढाण्यातील नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश”

दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजवादी पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

महत्वाच्या घडामोडी – 

“मनसेचं मिशन विदर्भ; अकोला महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार”

पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्राला टोला

राणेंच्या बालेकिल्यात शिवसेनेचं वर्चस्व; सिंधुदुर्गमध्ये इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here