मुंबई : उदयनराजेंचा साताऱ्यात पराभव भाजपने घडवून आणला. हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे. त्या बद्दल भाजपा शिवरायांचया वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय? असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. छत्रपतीचया प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती उदयनराजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजपा शिवरायांचया वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे..छत्रपतीचया प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे.
पण छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला..हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे..त्या बद्दल भाजपा शिवरायांचया वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?— Sanjay Raut (@rautsanjay61) January 15, 2020
दरम्यान, पंतप्रधान मोदींची तुलना शिवरायांशी केल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. टीका करताना संजय राऊतांनी ट्विट करत शिवरायांचे वंशज कुठे आहेत? असा सवाल केला होता. मंगळवारी पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी राऊतांना चांगलंच धारेवर धरलं होतं. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आता त्यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मला जाणता राजा म्हणा असं मी कुठेच म्हणालो नाही- शरद पवार
उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे; संजय राऊतांच वादग्रस्त वक्तव्य
“उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत सरळ शब्दात उद्धवची आणि संज्याची औकात काढल्याबद्दल त्यांच अभिनंदन”
“मुलाच नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का?”