रायगड : रायगड किल्ल्यावरील तिकीटघराचा शिवभक्तांनी कडेलोट केला आहे. पुरातत्व विभागाचे तिकीट घर शिवभक्तांनी हटवलं आहे. तसेच हे तिकीटघर हटवताना यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषदेखील करण्यात आला. कराच्या नावे जबरदस्ती पैशांची लूट केली जात असल्याचा आरोप शिवभक्तांनी केला आहे.
रायगडाच्या चित्त दरवाजाजवळ पुरातत्व विभागाने तिकीट घर उभारलं होतं. पुरातत्व विभागाकडून करवसुली करण्यात येत होती. रायगडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांना 25 रुपये कर भरावा लागत होता. मात्र कर भरुनही गडावर कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने शिवभक्त संतापले.
दरम्यान, काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शिवभक्त आणि शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. तिकीटघराची तोडफोड करत तिकीटघर दरीत ढकलून देण्यात आलं.
महत्वाच्या घडामोडी-
मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल
“डाॅ. तात्याराव लहाने यांना पद्मश्री मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला”
“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा समजू नये”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या सुख-दु:खात नेहमी पाठीशी ठाम उभे राहिले”