बेळगाव : महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावरुन 2 राज्यांच्या सरकारमधील वाद आता भलत्याच वळणावर जाण्याची चिन्हे आहेत. अशातच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जाेळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजब वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहीत नाही. त्यांनी तो वाचलाही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे होते. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत, असं अजब दावा गोविंद कार्जाेळ यांनी केला.
दरम्यान, कर्नाटकात दुष्काळ पडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेले. नंतरच्या पिढीतील शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहे, असंही गोविंद कार्जाेळ यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
लेकीच्या साखरपुड्यात राऊतांची फडणवीसांशी गळाभेट, चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“लॉकडाउनमध्ये मदत न देण्याचं केंद्र सरकारचं कारण ऐकून मन सुन्न झालं “
“…तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही”
मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा समोर आलाय, जनता नक्की धडा शिकवेल- चित्रा वाघ