औरंगाबाद : शिवसेनेचा लोगो असलेल्या वाहनातून प्रवास करत असलेले 2 जण बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला आहे. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते औरंगाबादमध्ये टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
हवेत फिरवलेली पिस्तूल ही गाडीत बसलेल्या व्हीआयपी व्यक्तीची असेल असे खैरे म्हणाले. बंदूक कोणी कोणाला दाखवली नाही. ते सगळं चुकीचं आहे. जलील यांच्या घराच्या बाजूलाच गोळ्या झाडल्या जातात. तसेच पिस्तूल दाखवून कोणीही दहशत पसरवत नाही. आम्हाला राग येतो पण आम्ही शांत बसतो. हा माणूस चुकून निवडून आला. आता सगळे लोक पश्चात्ताप करतात. जलील दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात, असं म्हणत खैरेंनी जलीलांवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, 2 दिवसांपूर्वी जलील यांच्या घराच्या बाजूलाच बंदूक चालली. एका भंगारवाल्याने ही बंदूक चालवली. उद्वव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेेंव्हापासून आमच्याकडे कोणीही दादागिरी करत नाही. बंडखोऱ्या, दगडफेक असले प्रकार आमच्याकडे होत नाहीत, असंही खैरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“ युवा मंत्री पब-पार्टीत गुंग आणि कार्यकर्ते ‘गोली मार भेजे मे’ स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचत आहेत”
राष्ट्रवादीला मोठा सुरूंग; 4 आमदारांचा शिवसेनेत प्रवेश
बेळगावला केंद्रशासित राज्य करा; शिवसेनेची पंतप्रधानांकडे मागणी
आता आम्ही त्यांच्यापुढे डोकं फोडून घ्यावं का?; अजित पवार संतापले