Home देश आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?- बाळासाहेब थोरात

आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?- बाळासाहेब थोरात

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकरी नेत्या सिताबाई तडवी या हरियाणा-राजस्थान सीमारेषेवर 26 जानेवारीपासून आंदोलनाला बसल्या होत्या. मात्र या आंदोलन कालावधीत सिताबाई तडवी यांचा जयपूर येथे मृत्यू झाला. आत्तापर्यंत जवळपास 60 शेतकऱ्यांचा आंदोलनकाळात मृत्यू झाला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी सीताबाई यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. त्यानंतर केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा जीव घेणार?, असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केंद्र सरकारसमोर उपस्थित केला.

दरम्यान, जयपूर स्टेशनला ट्रेनची प्रतीक्षा करत असताना अचानक सिताबाई तडवी यांची प्रकृती बिघडली आणि सकाळी 5 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती कळत आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल- जयंत पाटील

…तर आम्ही राज ठाकरेंना नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत

अखेर ठरलं! ‘या’ दिवसापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटण्याच्या मार्गावर