Home देश काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे- प्रकाश जावडेकर

काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे- प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण आले. या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले. यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

26 जानेवारीला काँग्रेस अशाप्रकारे शेतकऱ्यांना भडकवू शकते, यावरुन काँग्रेस कोणत्या थरावर आली आहे, त्याचं हे उदाहरण आहे. तसेच काँग्रेसच्या भडकवण्याच्या या राजकारणाला लोक नक्की उत्तर देतील, असं म्हणत जावडेकरांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि यश वाढत आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्टांची लोकप्रियता आणि यश घटत आहे. त्यामुळे त्यांना राजकीय घराण्यांची चिंता आहे. लोकांनी त्यांना नाकारलं आहे. मात्र, तीच काँग्रेस अहंकारात लोकांना भडकवण्याचं काम करत आहे, असा आरोप जावडेकरांनी यावेळी केला.

दरम्यान, पंजाबमध्ये त्यांचं सरकार असताना हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अशा राजनीतीचा आम्ही निषेध करतो, असंही जावडेकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“देशद्रोही ठरवून वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

“…हे म्हणजे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं”

शेतकऱ्यांवर टीका करणं कंगणाला पडलं महागात!

“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”