नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काही वेळापूर्वीच स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. तसेच गृहमंत्रालयाच्या या आदेशानुसार सिंघु, टिकरी, मुकरबा, नांगलोई, नकुरबा चौक या तणावग्रस्त भागातील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
महत्वाच्या घडामोडी-
दिल्लीतील आंदोलनात शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू
“घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील”
“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देऊ”
धनंजय मुंडेंकडून अधिकारी फैलावर