पुणे : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
नितीन राऊत यांना जबाबदारी घ्यायची नसेल आणि मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी ढकलायची असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांकडे ते खातं सोपवावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या काळात लोकांची आलेली बिलं ही अंदाजे आलेली बिलं आहेत. मागच्या बिलांची सरासरी काढून आलेली बिलं आहेत. तुम्ही आधीच्या आलेल्या बिलांच्या आधारे बिल देऊ शकत नाही. तुम्ही विजेच्या बिलात तरी दिलासा द्यायला हवा, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची”
ऐतिहासिक! जो बायडन बनले अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष
“आम्ही चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून निवडून आणू”
शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ; धनंजय मुंडे प्रकरणावरुन अतुल भातखळकरांची टीका