वॉशिंग्टन : जो बायडेन यांनी आज अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलीय. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायूर्ती सोनिया सोटोमेयर यांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिली. तर, भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे.
वॉशिंग्टन डीसी येथे हा शपथविधी सोहळा थाटात पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश यांनी सपत्निक उपस्थिती होती.
दरम्यान, याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पॉपस्टार लेडी गागा यांनी अमेरिकेचे राष्ट्रगीत गायले. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडताच, जो बायडन यांनी ट्विट करत,‘अमेरिकेसाठी एक नवा दिवस’ असल्याचं म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
“आम्ही चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून निवडून आणू”
शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ; धनंजय मुंडे प्रकरणावरुन अतुल भातखळकरांची टीका
“निलेश राणेंवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”
राज्य सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत- देवेंद्र फडणवीस