मुंबई : मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित चालवतो. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
म्हणे हातात स्टेअरिंग आहे, कशाचं स्टेअरिंग. खरं म्हणजे चुकलंय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी यायचं की, कुठल्यातरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं? हे चुकून इकडं आलेत, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून सरकारी यंत्रणा हाताळण्याचं काम त्यांच्याकडे नाही. त्यांना ना खड्डे माहितीये, ना तिजोरी माहितीय. गाडी कशी चालवायची माहिती असेल, पण सरकार कसं चालवायचं याचा अभ्यास नाही, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोकं मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील- नारायण राणे
धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची हमी शरद पवार देत असतील तर…- प्रकाश आंबेडकर
राज्य सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत- देवेंद्र फडणवीस
‘हे’ तर राज्य सरकारचं तुघलकी फर्मान; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची टीका