मुंबई : महाविकास आघाडी सरकारने ‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर देशाचे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात आलं आहे. मात्र, प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते, असं जयंत पाटील म्हणाले.
या व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल. संबंधित व्यक्ती अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना स्पष्टपणे दिसत आहे. हा न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय.
सदर व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे.प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल.सदर इसम अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे, न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 17, 2021
दरम्यान, अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रिमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला कशा काय माहिती होत्या? असा सवालही जयंत पाटील यांनी यावेळी केला केला आहे.
अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रीमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला माहिती होत्या. महाविकास आघाडी सरकारने या टीआरपी घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 17, 2021
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार?; राऊतांची मोठी घोषणा
“धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता”
‘या’ दिवशी दिसणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर!
“ज्यांचं बोट धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आला त्याच सेनेला संपवन्याच काम भाजप करत आहे”