Home महाराष्ट्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर विरोधकांकडून वारंवार राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे सोमवारपासून भाजप महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे, असे इशारा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी दिला आहे.

सामाजिक न्याय सारखे मंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण सदर महिलेशी संबंध ठेवले, तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले, याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे, याचा विचार करावाच लागणार आहे, असं भाजपा महिला मोर्चाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे

दरम्यान, मुंडे यांच्या विरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धडपड ती महिला करत आहे. मुंडे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप पाहता व या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. असेही पत्रकात स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सत्तेसाठी एवढी लाचारी?, कुठे फेडाल ही पापं?”

सत्ता हातून गेल्याने काहीजण अस्वस्थ झालेत; मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या भाजपा नेत्यांना पवारांचा टोला

कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री- अनिल देशमुख

…तर मग मीच माघार घेते तुमचीही तिच इच्छा आहे- रेणू शर्मा