सांगली : जत-शेगांव रोडवर सराफाकडील 4.5 किलोचे सोने लुटल्याप्रकरणी 5 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 किलो 530 ग्रॅम वजनाचे सोने, ओमनी कार, पिस्तुल सदृश्य लायटर, 3 मोबाईल असा सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रविण उत्तम चव्हाण (वय-27), विजय बाळासाहेब नांगर (वय-27, यपावाडी, ता.आटपाडी), विशाल बाळू कारंडे (वय-27, रा.गोरेगाव, ता.खटारा, जि.सातारा), तात्यासाहेब शेट्टीबा गुसाळे (वय-36, रा.मरडवाघ, ता.खटाव, जि.सातारा), वैभव साहेबराव माने (वय-32, रा.भोसरे, ता.खटाव, जि.सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
बाळासाहेब वसंत सावंत (रा.पळसखेड) यांचा सराफी व्यवसाय आहे. बेळगावहून त्यांनी 4.5 किलो सोने आणले होते. गुरूवारी मध्यरात्री ते कारमधून (केए-22-एमबी-5422) प्रविण चव्हाण यांच्यासोबत जतहून शेगावकडे निघाले होते. जतपासून काही अंतरावर गेल्यानंतर प्रविण चव्हाण यांनी लघुशंकेसाठी गाडी थांबविली. त्याचवेळी ओमणी गाडीतून (एमएच-12-डीवाय-1168) मधून संशयित आले. त्यांनी पिस्तुल सदृश्य लायटरचा धाक दाखवून सावंत आणि चव्हाण यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर त्यांच्या गाडीतील 4.5 किलोचे सोने घेऊन पसार झाले.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. सावंत यांच्यासोबत असलेल्या चव्हाण यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी चाैकशी केली. त्यांच्या चाैकशीत तफावत आढळून आले. त्यांची कसून चाैकशी केल्यावर चव्हाण याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अन्य 4 संशयितांना खानापूर तालुक्यातील विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 4 किलो 530 ग्रॅम वजनाचे सोने, ओमनी कार, पिस्तुल सदृश्य लायटर, 3 मोबाईल असा सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी-
“शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा”
“धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही”
लग्न न होता होणारी मुलं ही मानायची का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
“शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”