पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नैतिकता पाळावी, असं म्हणत सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
शरद पवारांनी धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर आहेत, असे म्हटलं होते. शरद पवार कडक धोरण स्वीकारतात. त्यांनी 50 वर्षाच्या जीवनात आरोप झाल्यानंतर त्या व्यक्तीला पाठीशी घातले असे झाले नाही, पण पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने भ्रमनिरास झाला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, नैतिकतेची चाड पवार साहेबांकडून अपेक्षित आहे. भारतीय राजकारणात अशी घटना घडल्यानंतर राजीनामा देण्याची कृती झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी-
“धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही”
लग्न न होता होणारी मुलं ही मानायची का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
“शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”
पुलवामा हल्ला प्रकरणी अर्णब गोस्वामींचा संदर्भ देत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…